फोर्टमध्ये ७५ वर्षीय वृद्धाची हत्या

फोर्ट परिसरात ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एमआयए पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

फोर्टमध्ये ७५ वर्षीय वृद्धाची हत्या
SHARES

फोर्ट परिसरात एकट्या राहणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. अजा तेजलिंग लामा असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. चोरीच्या उद्देशानेच हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एमआयए पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला

फोर्टच्या शहीद भगत सिंग मार्गावरील संत निवास इमारतीत लामा हे मागील ५० वर्षांपासून रहात आहेत. पत्नी आणि मुलांच्या अकाली निधनामुळे ते एकटेच घरात रहात होते. त्याचं शरीर ही मागील काही दिवसांपासून सात देत नव्हते. दरम्यान मंगळवारी सकाळी इमारतीच्या पहिल्या माळ्यावर लामा हे रक्ताच्या थारोळ्यात सुरक्षा रक्षकांना दिसून आलं. त्यावेळी त्याने पोलिसांना पाचरण केलं. पोलिसांनी पंचनामा करत लामा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.


चोरीच्या उद्देशानेच हत्या

प्राथमिक माहितीत लामा यांची हत्या ही चोरीच्या उद्देशानेच केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच ही हत्या असा व्यक्ती करू शकतो, जे लामा यांच्या परिस्थितीशी परिचित असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिस परिसरातील सर्व सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांकडे चौकशी करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा