पुण्याच्या इंजिनिअरिंगच्या मुलीवर मुंबईत बलात्कार

पुण्यातील इंजिनिअरिंगच्या मुलीला मुंबईच्या ओशिवरा परिसरातील एका घरात डांबून ठेवत तिच्यावर महिन्याभरापासून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

SHARE

पुण्यातील इंजिनिअरिंगच्या मुलीला मुंबईच्या ओशिवरा परिसरातील एका घरात डांबून ठेवत तिच्यावर महिन्याभरापासून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तरुणीवर बलात्कार करतानाचे तब्बल ४० व्हिडिओ माथेफिरू आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून सय्यद आमिर मन्सूर हुसेन उर्फ शिरोज याला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

मूळची पुण्याची असलेल्या तरूणीची फेसबुकवर सय्यद सोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीचे संबध होते. तरुणीचा विश्वास जिंकत सय्यदने तरुणीला महिन्याभरापूर्वी घरी जेवायला येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानुसार तरुणी घरात आल्यानंतर सय्यदने तिला रात्री थांबण्याचा आग्रह केला. तिची वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी व्यवस्थाही केली. मात्र मध्यरात्री तिला झोप लागल्यानंतर खोलीला बाहेरून कडी लावली आणि कोंडून ठेवलं.


तरुणीवर केला बलात्कार

दुसऱ्या दिवशी ती निघाली त्यावेळी दरवाजाला बाहेरून कुणी तरी कडी लावली होती. सय्यदला हाक मारूनसुद्धा बाहेरून कोणीही प्रतिसाद देत नव्हतं. मध्यरात्री तरुणी झोपली असतानाच तिचा मोबाइल सय्यदने काढून घेतला होता. त्यामुळे तरुणीकडे कुणाची मदत घेण्यासाठी कोणताही पर्याय राहिला नव्हता. त्यानंतर सय्यदनने येऊन तरुणीवर बलात्कार केला. 


आरोपीच्या तावडीतून केली सुटका

ती कुठे ही पळू जाऊ नये यासाठी तिचे कपडेही त्याने फाडून टाकले. तसंच तिला बदनाम करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करतानाचे ४० अश्लील क्लिप त्याने बनवले होते. तिचे केस कापून तिला विद्रुप बनवलं होतं. कसंबसं सय्यदच्या तावडीतून सुटत तरुणीने पुण्यातील आपल्या बहिणीचे घर गाठत तिला सर्व हकीगत सांगितली.

या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदवत मुंबईत येऊन सय्यदला अटक केली. न्यायालयाने सय्यदला १० सप्टेंबरपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या