इंद्राणीनं घेतला नैराश्य दूर करणाऱ्या औषधांचा ओव्हरडोस

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • क्राइम

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या शरीरात बेंझोडायझोपिन आैषधांचं उच्च प्रमाण आढळून आल्याची माहिती जे. जे. रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. इंद्राणीच्या वैद्यकीय चाचणी अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. 

नैराश्य दूर करणारं औषध

प्रकृती अचानक बिघडल्याने इंद्राणीला शुक्रवारी रात्री जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एका बाजूला औषधांची मात्रा अधिक प्रमाणात घेतल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाल्याचं म्हटलं जात होतं. तर, दुसऱ्या बाजूला ही औषधं तिला आर्थररोड कारागृहात कशी मिळाली, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं. बेंझोडायझोपिन हे औषध नैराश्य दूर (अॅण्टी डिप्रेशन) करण्यासाठी वापरण्यात येतं.

कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह

त्यातच तिच्या  युरिनच्या चाचणीत उच्च प्रमाणात बेंझोडायझोपिन आैषधाचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आल्याने कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे.

इंद्राणीला लावलेलं व्हेंटीलेटर काढण्यात आलं असून तिच्या प्रकृतीत सुधारणार होत आहे. ती उपचारांना प्रतिसाद देत असून जेवणही घेत असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.  


हेही वाचा-

इंद्राणी मुखर्जीची प्रकृती स्थिर, जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू


पुढील बातमी
इतर बातम्या