इंद्राणी मुखर्जीची प्रकृती धोक्याबाहेर

इंद्राणीला लावलेलं व्हेंटीलेटर काढण्यात आलं असून तिच्यावर अद्याप अतिक्षता विभागात (अायसीयू) उपचार सुरू असल्याचं जे. जे. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय सुरासे यांनी सांगितलं.

इंद्राणी मुखर्जीची प्रकृती धोक्याबाहेर
SHARES

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची प्रकृती धोक्याबाहेर आल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. रविवारी तिला लावलेलं व्हेंटीलेटर काढण्यात आलं असून तिच्यावर अद्याप अतिक्षता विभागात (अायसीयू) उपचार सुरू असल्याचं जे. जे. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय सुरासे यांनी सांगितलं.


शुद्धीत आली

रविवारी जे. जे. रुग्णालयाकडून इंद्राणी मुखर्जी हिच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती देण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री इंद्राणीला जे. जे. रूग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. ही स्थिती रविवारी सायंकाळपर्यंत कायम होती. पण, आता ती शुद्धीत आल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.


वैद्यकीय तपासण्या

इंद्राणीच्या ब्रेन हेमरेज, अन्न विषबाधा इ. शक्यतेवर आधारीत चाचण्या तसंच रक्ततपासणी, एमआरआय, सिटीस्कॅन या तपासण्या देखील करण्यात आल्या. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ती उपचारांनाही प्रतिसादही देत आहे.


न्यूमोनियाचा पॅच

एक्सरे आणि एचआर सीटी चाचण्यांमध्ये इंद्राणीच्या फुप्फुसाच्या उजव्या बाजूला न्यूमोनियाचा पॅच दिसत असून तिला तापही असल्याचं डाॅक्टर म्हणाले. तिचं व्हेंटीलेटर काढण्यात आलं असून तिच्यावर योग्य उपचार सुरू असल्याचं डाॅ. सुरासे यांनी सांगितलं.



हेही वाचा-

पीटर मुखर्जीची आर्थररोड कारागृहात चौकशी

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी आरोपपत्र सादर, लैंगिक अत्याचाराचा उल्लेख मात्र नाही



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा