पीटर मुखर्जीची आर्थररोड कारागृहात चौकशी


पीटर मुखर्जीची आर्थररोड कारागृहात चौकशी
SHARES

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालया (ईडी)ने पीटर मुखर्जी यांची चौकशी केली. तब्बल ६ तास चाललेल्या या चौकशीत मनी लाँड्रिंगबाबत माहिती घेण्यात आल्याची सूत्रांनी सांगितलं.


कागदपत्रांची पडताळणी

याप्रकरणी यापूर्वी सह आरोपी इंद्राणी मुखर्जी व कार्ती चिदंबरम यांची भायखळा कारागृहात समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात मनी लाँड्रिंगबाबत तपास करणाऱ्या ईडीने पीटरची मंगळवारी आर्थररोड कारागृहात चौकशी केली. यावेळी ईडीचे ४ अधिकारी उपस्थित होते. याप्रकरणात मनी लाँड्रिंगसाठी वापरण्यात आलेल्या पैशांबाबत ईडीच्या हाती लागलेल्या कागदपत्रांची पीटरकडून पडताळणी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.


तपासणी का?

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त ४.६२ कोटींची परदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी ३०५ कोटी रुपये उभे केले होते.


गुंतवणुकीला झुकते माप

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित आयएनएक्‍स मीडिया फर्ममधील परकीय गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने कार्ती, पीटर, इंद्राणी मुखर्जी व अन्य संबंधितांविरोधात सक्त वसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंद केला आहे. ईसीआयआर हा एकप्रकारचा एफआरआर असून त्यात सीबीआने नुकतीच कार्तीला अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा