शस्त्रसाठ्यासाठी श्रीकांत पांगारकरनेच केली आर्थिक मदत!

नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी जालन्यातून अटक केलेल्या श्रीकांत पांगारकर यानेच ती घातक शस्त्रे खरेदीसाठी आर्थिक मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकणी एटीएसच्या विशेष न्यायालयाने पांगारकरला 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रसाठ्याच्या खरेदीसाठी श्रीकांत पांगारकर यानेच वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळकर यांना आर्थिक मदत केली आहे. या चौघांना शस्त्र बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते शस्त्रनिर्मितीचं संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आल्याचं श्रीकांतच्या चौकशीतून पुढे आलं आहे. 

भावाच्या घराचीही झडती

श्रीकांतनेच ही घातकशस्त्रे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने काही ठिकाणांची रेकी केली होती. त्याच्या घरातून एक हार्डडिस्क, पेनड्राइव्ह, तीन मोबाईल आणि काही संशयास्पद साहित्य आणि काही आक्षेपार्ह पुस्तकंही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा मास्टरमाईंड वेगळाच असून त्याचा शोध घेण्यासाठी पांगारकर याची इतर आरोपींसह चौकशी करण्यात येणार आहे.

राज्यभरात अटकसत्र सुरू

नालासोपारा येथून स्फोटकांसह वैभव राऊतला अटक केल्यानंतर राज्यभरात अटकसत्र सुरू झालं. औरंगाबादमधून अटक केलेल्या सचिन अंदुरे याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. त्याच्या चौकशीत पांगारकरचं नाव पुढे आलं होतं. शिवाय काल सोमवारी सचिन अंदुरेच्या चुलत भावाच्या घराची एटीएसकडून झडती घेण्यात आली.

पांगारकर याला पोलिसांनी जालनातील महसूल कॉलनी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतलं होतं. तो दोन वेळा नगरसेवक होता. 2012 मध्ये तो शिवसेना सोडून हिंदुत्ववादी गटात सहभागी झाला. गोवा आणि कोल्हापूर येथे त्याने काही काळ वास्तव्य केलं आहे.


हेही वाचा - 

दाभोलकर हत्या प्रकरण: पांगरकरला २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी

माजी सिडको संचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

पुढील बातमी
इतर बातम्या