कर्ज फेडण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल, यूट्युबवर पाहून छापल्या शंभरच्या बनावट नोटा

लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्याची ऐपत नसल्यामुळे त्याने कर्ज भागवण्यासाठी थेट नोटा छापण्यास सुरूवात केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दीपक घुंगे (२७) याला अटक केली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी भारतीय चलनाच्या शंभर रुपयांचे ८९६ नोटा म्हणजेच ८९,६०० रुपये पोलिसांनी जप्त केले. या नोटा खरे नसून दीपक घुंगेकडून युट्यूब वर व्हिडिओ पाहून बनव्याची कबूली त्याने पोलिसांना दिली आहे.

हेही वाचाः- राज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ, ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार, राज्यांतर्गत रेल्वे सुरू

दीपक घुंगे याने बीफार्मचं शिक्षण घेतलं असून तो सोलापूरचा रहिवाशी आहे. दिपकने अनेकांकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज नोकरी करून तो फेडणार होता. मात्र कोरोना संक्रमण आल्याने राज्यात सर्वत्र लाँकडाऊन पुकारण्यात आले. नोकरी मिळत नसल्याने हताश झालेल्या दिपकला कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न पडू लागला होता. अशातच एकेदिवशी त्याने यूट्युबवर बनावट नोटा कशा बनावतात याचा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ पाहून दीपक याने खोट्या नोटा बनवून आपलं कर्ज परत फेडण्याचा पर्याय निवडला. याच बनावट नोटांची डिलेव्हरी करण्यासाठी दिपक हा सीताराम मिल कंपाउंड लोअर परळ येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

हेही वाचाः- कोव्हीशिल्ड लशीच्या चाचणीसाठी मुंबईतून ४३ स्वयंसेवकांची निवड

दीपकच्या अंग झडतीत त्याच्याजवळ भारतीय चलनाचे शंभर रुपयांचे ८९६ नोटा म्हणजेच ८९,६०० रुपये पोलिसांनी जप्त केले. या नोटा खरे नसून दीपक घुंगेकडून युट्यूब वर व्हिडिओ पाहून बनवण्यात आल्या होत्या, पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा लोक तपासून पाहतात. मात्र शंभराची नोट न तपासताच खिशात ठेवतात. त्यामुळे त्याने शंभराच्या बनावट नोटा बनवण्याचे ठरवले. नोटा बनवण्यासाठी पुण्याच्या दौंड येथे एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्या फ्लॅटची माहिती मिळताच पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला आणि पोलिसांनी लॅपटॉप,लेझर स्कॅनर प्रिंटर, लॅमिनेटर, अर्धवट छपाई झालेल्या नोटांचे कागद, हिरव्या रंगाचे फाईल बंडल पेपर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणात त्याच्या व्यतिरिक्त कुणाचा सहभाग आहे का? हे पोलिस तपासून पहात आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या