Advertisement

राज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ, ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार, राज्यांतर्गत रेल्वे सुरू

राज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारनं रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

राज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ, ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार, राज्यांतर्गत रेल्वे सुरू
SHARES

राज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारनं रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. 

अनलॉक ५ ची राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू होणार आहेत. ५० टक्के क्षमतेनं हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, मुंबईच्या डबेवाल्यांना ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा आहे. डबेवाल्यांना लोकल प्रवासासाठी QR कोड दिले जाणार आहेत.

मार्गदर्शन सूचना

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक्स्प्रेसनं जाता येणार

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल वाढवणार

पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार

शाळा आणि कॉलेजेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार

राज्यात ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू राहणार

उद्यापासून मध्य रेल्वेवर अतिरिक्त ८ लोकल धावणार

अतिरिक्त लोकलमध्ये २ लेडीज लोकलचा समावेश

CSMT-कल्याण, कल्याण-CSMT लेडीज लोकल धावणार



हेही वाचा -

मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त 

दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा