मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बोरिवलीत ही घटना घडली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, महिलेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी ५३ वर्षांच्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं मुंबईच्या बोरिवली पोलिसात एफआयआर दाखल केली आहे. महिलेचं म्हणणं आहे की, स्थानिक प्रभाग अध्यक्षानं नगरसेवकाच्या कार्यालयात तिचा विनयभंग केला होता. तिनं जुलै २०२० मध्ये भाजप कार्यकर्ता म्हणून कामकाज सुरू केलं होतं.
अंजली खेडकर या भाजप नगरसेवकाच्या कार्यालयात संध्याकाळी ६.३० वाजता घडली असं म्हटलं जातंय. १५ ऑगस्ट २०२० रोजी बोरिवली (पश्चिम) मधील वजीरा नाका इथं हे घडलं. लेखा सांगते की, जुलैमध्ये जेव्हा त्यांनी नंबरची देवाणघेवाण केली तेव्हा ती स्थानिक प्रभाग अध्यक्ष असलेल्या भेटली. त्यानंतर तिनं पक्षाशी संबंधित कामात मदत करण्यास सुरुवात केली.
तिनं निवेदनात म्हटलं की, त्या व्यक्तीनं तिला खेडकर यांच्या कार्यालयात बोलावलं. त्यानंतर त्यानं कार्यालय बंद केलं. त्यानंतर दिवेही बंद केले. नंतर, ती म्हणाली की, त्यानं तिच्या मांडी आणि खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की तिला पक्षात काम करायचं असेल तर तडजोड करावी लागेल. ती तिथून निघून गेली आणि पाच दिवसांनी आमदार सुनील राणे यांच्याकडे तोंडी तक्रार केली, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिनं राणे तसंच खासदार गोपाल शेट्टी यांना लेखी तक्रार दिली.
त्यानंतर तिनं बुधवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत एफआयआर दाखल केला. बोरिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक म्हणाले की, त्यांनी एफआयआर नोंदवला आहे आणि तपास सुरू आहे.
दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस आणि शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
तर भाजपाच्या कार्यालयातच महिला सुरक्षित नाहीत,” असं सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
हेही वाचा