डोंबिवली बलात्कार प्रकरण : विद्या चव्हाण म्हणाल्या...

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २० मुलांनी बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

डोंबिवली बलात्कार प्रकरण : विद्या चव्हाण म्हणाल्या...
SHARES

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर २९ मुलांनी मिळून सामूहिक बलात्कार (Minor girl gang raped by 29) केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलगी ही १५ वर्षीय आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणावर  राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांची धिंड काढू अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे. या घटनेनंतर विद्या चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपींना आमच्या ताब्यात द्या आशा घोषणा दिल्या.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं, डोंबिवलीच्या भोपरमध्ये अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं. महिला अत्याचाराची सातत्यानं वाढणारी ही प्रकरणं चीड आणणारी आहेत. डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारनं आतातरी तातडीनं आणि गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांत मुलीनं तक्रार दिली. तिनं सांगितलं की, जानेवारी २०२१ ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या ओळखीतल्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानुसार रात्री मानपाडा पोलिसांनी (Manpada Police Dombivli) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी १५ वर्षीय अल्पवयीन असल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतलं. त्यापैकी दोन अल्पवयीन मुलं आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. महिला सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत प्रकरणाचा तपास करत आहेत.हेही वाचा

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी 'हा' आपत्कालीन क्रमांक सुरू केला

डोंबिवलीत १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, २१ जणांना अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा