डोंबिवलीत १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, २१ जणांना अटक

डोंबिवलीतील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

डोंबिवलीत १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, २१ जणांना अटक
SHARES

डोंबिवलीतील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना डोंबिवलीतील भोपर परिसरातील आहे. एका अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी जानेवारी २०२१ पासून २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं काल रात्री मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रियकरानं ८ महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान आरोपीनं बलात्काराचा व्हिडीओही शूट केला होता. याच व्हिडीओच्या आधारे आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करत अत्याचार केले आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आलं असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवत २३ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित सर्व आरोपींनी पीडितेला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, राबळे अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत, बाकीचे सर्व आरोपी १८ वर्षांपुढील आहेत.हेही वाचा

मुंबई लोकल हायअलर्टवर, दहशतवाद्यांकडून घातपातासाठी आऊटसोर्सिंग पद्धतीचा वापर?

गेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा