गेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार

गेल्या ८ महिन्यांत ३६५ अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

गेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार
SHARES

गेल्या ८ महिन्यांत ३६५ अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसंच, ७१६ मुलींच्या अपहरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या ४ हजार ५३९ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी ३ हजार ५०७ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.

२०१९ मध्ये ६ हजार ४३८ गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. तर, ५ हजार ३२८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत घट झाली होती. मुंबईत दिवसभरात दाखल होणाऱ्या अत्याचाराच्या सरासरी ३ गुह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसांत एका गुन्ह्यावर आले होते.

गेल्या वर्षभरात ४४५ मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी ४१९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान एकूण ६१९ अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यात अल्पवयीन मुलींसंदर्भातील ३६५ गुह्याचा समावेश आहे. तर, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाप्रकरणी ७१६ गुन्हे नोंद झाले असून ५८६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा