मुंबई लोकल हायअलर्टवर, दहशतवाद्यांकडून घातपातासाठी आऊटसोर्सिंग पद्धतीचा वापर?

लोकलमध्ये घातपात घडवण्याचं षडयंत्र अंमलात आणण्यासाठी आरोपींना बजेट दिलं होतं.

मुंबई लोकल हायअलर्टवर, दहशतवाद्यांकडून घातपातासाठी आऊटसोर्सिंग पद्धतीचा वापर?
SHARES

दहशतवाद्यांचा मुंबई लोकलमध्ये घातपात करण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी ‘आऊटसोर्सिंग’ची पद्धत वापरण्यात आल्याचंही बोललं जातंय. माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात ही माहिती समोर आली आहे.

लोकलमध्ये घातपात घडवण्याचं षडयंत्र अंमलात आणण्यासाठी आरोपींना बजेट दिलं होतं. यातील बहुतांश लोक एकमेकांना ओळखत नव्हते. गेल्या आठवड्यात एटीएसनं जोगेश्वरी इथल्या झाकीर शेख आणि मुंब्रा इथून रिझवान मोमीन या दोघांना अटक केली होती. इयत्ता नववीचा ड्रॉपआऊट असलेला झाकीर शेख हा टॅक्सी चालक आहे, तर मोमीन ट्युशन टीचर आहे.

१७ सप्टेंबर रोजी एटीएसने यूएपीए कायद्याच्या कलम १८ अंतर्गत झाकीर शेख आणि त्याचा कथित परदेशी हस्तक अँथनी उर्फ अनिस उर्फ अन्वर उर्फ अन्नू यांच्याविरोधात दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितलं की, मुंबईत अटक केलेले लोक अँथनीच्या संपर्कात होते, त्याला इतर ठिकाणाहून सूचना मिळाल्या होत्या.

दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये गॅस सिलेंडर सहाय्यानं हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागानं दिला आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागानं तशी माहिती रेल्वे पोलिसांना दिल्याचं समजतंय. या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.

केवळ शेखच नाही तर मोमीन देखील अँथनीच्या संपर्कात होता. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटल्यानं शेखनं त्याचा फोन मोमीनला नष्ट करण्यासाठी दिला होता. त्यानं तो तोडून घराजवळच्या नाल्यात टाकला. अधिक तपशील मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक अहवालाची आणि तुटलेल्या फोनवरून डेटा पुनर्प्राप्त करण्याची सध्या एटीएस वाट पाहत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धारावीतून समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेखला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यावेळी त्याचे २० वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचं उघड झालं होतं. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली होती.



हेही वाचा

अश्लील चित्रपट प्रकरण : राज कुंद्राला जामिन मंजूर

गेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा