अश्लील चित्रपट प्रकरण : राज कुंद्राला जामिन मंजूर

राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

अश्लील चित्रपट प्रकरण : राज कुंद्राला जामिन मंजूर
SHARES

अश्लील चित्रपट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार रायन थोरपे यांना जमीन मंजूर झाल आहे. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचे पती राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते एका अ‍ॅपद्वारे प्रदर्शित करणे यासारख्या गंभीर आरोपांमुळे अटक करण्यात आली होती.

अश्लील चित्रपट बनवल्याच्या प्रकरणात राज कुंद्राला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेनं राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी त्यांना त्यच्या घरात सर्व्हर आणि ९० व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राज कुंद्रानुसार, इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केलं गेलेलं नाही.

याशिवाय लोकांना काम देण्याच्या बहाण्यानं अश्लील व्हिडीओ बनवून घेतल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले होते.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रानं या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे ८ ते १० कोटींची गुंतवणूक केली होती. तसंच, या व्हिडीओंचं शूटिंग भारतात करण्यात आलं आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केलं गेलं होतं.

राज कुंद्राच्या कार्यालयातून २४ हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३५ चित्रपट पोलिसांना सापडले आहेत. दुसऱ्या संगणकामध्ये, पोलिसांना १६ चित्रपट मिळाले आहेत, जिथं दुसऱ्या संगणकावरून ६० पेक्षा जास्त चित्रपट आणि PPT सापडले आहेत. ज्यामुळे राज यांचा प्लॅन उघड होत आहे.

राज कुंद्रा व्यतिरिक्त इतर आरोपींच्या संगणक आणि मोबाईलवरुन अॅपची सामग्री, खर्च, उत्पन्न आणि भविष्यातील योजनांसह इतर महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.हेही वाचा

बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग रचणाऱ्या 'मुन्नाभाई'ला मुंबई ATSकडून अटक

मुंबईत राहणारा जान मोहम्मद २० वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा