मुंबईत राहणारा जान मोहम्मद २० वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात

मंगळवारी दिल्ली पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी इथं राहणारा होता. याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं महत्त्वाची माहिती दिली.

मुंबईत राहणारा जान मोहम्मद २० वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात
SHARES

मंगळवारी दिल्ली पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी इथं राहणारा होता. याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं पत्रकार परिषद घेऊन मबत्त्वाची माहिती उघड केली आहे. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

“काल तुम्ही दिल्ली पोलिसांचा पत्रकार परिषद बघितली. त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं आहे. त्याचं पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती”, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं.

“जान शेखनं ९ सप्टेंबरला जाण्याचं नियोजित केलं. त्यानं १० तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कनफॉर्म होत नव्हतं. तर त्यानं १३ तारखेचं वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत तिकीट घेतलं. गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनचं त्यानं तिकीट घेतलं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो मुंबई सेंट्रलहून एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला. प्रवासादरम्यान त्याला कोटाला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ हत्यारं किंवा स्फोटकं मिळाली नाही. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमची एक टीम आज संध्याकाळी जाणार आहे. दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती घेऊन येणार. तसंच आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. त्यानंतर ही केस पुढे कशी जातेय ते बघू”, अशी माहिती विनीत अगरवाल यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, मुंबईत रेकी केली नव्हती. मुंबईमध्ये रेकी केली जाईल, असा अंदाज होता, असं अगरवाल यांनी स्पष्ट केलं. याशिवाय एकही दहशतवादी किंवा त्यांचा साथीदार मुंबईत आला नाही, असंही ते म्हणाले.

जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली. “जान मोहम्मदनं काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केलं, त्यानंतर त्यानं कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्यानं आपल्याला सांगितलं, की तो काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे” अशी माहिती त्याच्या पत्नीनं पोलिसांना दिली.

पत्नीला याबाबत संशय आल्यावर त्यानं मोबाईलमध्ये तिकीट दाखवलं. मात्र पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्यानं घाईघाईनं कपडे बॅगेमध्ये भरले. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीनं दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितलं की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला १२ सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया हुसैन यांनी दिली.

फय्याज यांनी सांगितलं की त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. १३ तारखेला जान मोहम्मदनं आपल्याला फोन केला होता, पण दोघंही बोलू शकलो नव्हतो, असंही फय्याज यांनी सांगितलं.



हेही वाचा

देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट उधळला, मुंबईतल्या एकाला अटक

राज्यात महिलांवर होणाऱ्या ८० टक्के अत्याचारामागे परप्रांतीय, मनसेचा दावा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा