देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट उधळला, मुंबईतल्या एकाला अटक

अटक करण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी एक मुंबईचा असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट उधळला, मुंबईतल्या एकाला अटक
SHARES

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षानं बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी एकूण सहा संशय़ित दहशतवाद्यांना अटक केलं आहे. त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसंच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती.

अटक केलेल्या संशयितांमध्ये मुंबईत राहणाऱ्या एकाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचं नाव समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh ) असून त्याला राजास्थानच्या कोटामधून अटक करण्यात आलंय. तो सायन वेस्टमधल्या एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

देशात सध्या सणांची धूम आहे. या पार्श्वभमीवर देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हा कट दिल्ली पोलिस तसंच एटीसनं उधळून लावला. पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे.

मुंबईचा जान शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेनं जात होता. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख हा दाऊदचा भाऊ अनिस याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस जान शेखच्या घरी पोहोचले. तसंच पोलिसांनी घराची तपासणी करुन त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतलं. सध्या जान शेखचे कुटुंबीय धारावी पोलीस ठाण्यात असून त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे धारावी पोलीस ठाण्यासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे. हे संशयित ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी अटक केलेले आरोपी शस्त्रास्त्रे तसंच दारुगोळा जमवत होते.

मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलीस विशेष कक्षाला तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. तसेच येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसंच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.



हेही वाचा

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मोहीम, 'या' १० उपाययोजनांवर भर

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने केला ब्रश; १८ वर्षीय मुलीचा मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा