Advertisement

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने केला ब्रश; १८ वर्षीय मुलीचा मृत्यू


टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने केला ब्रश; १८ वर्षीय मुलीचा मृत्यू
SHARES

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश केल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. मुंबईतील धारावी परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. यावेळी संबंधित मुलगी झोपेतून उठल्यानंतर ब्रश करण्यासाठी गेली. ओट्यावर टूथपेस्टशेजारीच उंदीर मारण्याची पेस्ट ठेवली होती. मुलीने नजरचुकीनं टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि त्यानं ब्रश केले.

मुलीला ब्रश करताना पेस्टची चव वेगळीच लागली. तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान क्षणार्धात टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावेळी तिने तत्काळ तोंड धुतले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उंदीर मारायचे विष शरीरात सर्वत्र पसरले होते. ती आजारी पडली. उपचारासाठी तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

काही काळानंतर, तिच्या पोटदुखायला लागली. तिने पोटदुखीची तक्रार केली, त्यानंतर तिच्या आईने तिला धारावीच्या एका रुग्णालयात नेले आणि तिथे औषधोपचार करण्यात आले. मात्र, पोटदुखी कायम सुरु होती. तीन दिवस पोटदुखीची तक्रार करत राहिल्यानंतर तिच्या आईने तिला विश्वासात घेतले आणि तिची चौकशी केली. तेव्हा तिने तिला सांगितले की तिने चुकून टूथपेस्टसाठी उंदीर विषाची पेस्ट वापरली, अशी माहिती एका पोलिसांकडून देण्यात आली. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा