Sushant suicide case: मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी दीड लाख फेक अकाऊन्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सोशल मिडियावर मुंबई पोलिसांची जाणून बुजून बदनामी केल्याचा आऱोप खुद्द पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी केला होता. या प्रकरणात आता दीड लाखाहून अधिक फेक अकाऊन्ट मुंबई पोलिसांनी शोधून काढले आहेत. तर मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी ‘बॉट अप्लिकेशन’चा वापर करण्यात आल्याची माहिती यापूर्वीच पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिली होती.

हेही वाचाः-नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर BOTS चा वापर केला गेला होता. सोशल मीडियावर दीड लाखांहून अधिक बनावट अकाऊंट तयार करण्यात आले, असा धक्कादायक खुलासा मुंबई पोलिसांनी केला होता. १४ जूनला सुशांत सिंह पाजपूतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर वांद्रे पोलिस ठाण्यात आत्महत्येमागील कारण शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत असताना. त्यांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणात ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले.

हेही वाचाः-IPL 2020 च्या अखेरच्या सामन्यात मुंबई पराभूत; हैदराबादचा Playoffs मध्ये प्रवेश

सोशल मीडियावरील यातील बहुतेक अकाऊंटही फेक असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासा दरम्यान निष्पन्न झाले आहे. मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या या घटनेला आधारून सायबर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे देखील दाखल कर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तर अद्यापही सायबर सेल युनिट या प्रकरणातचा सखोल तपास करत असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांचा मुंबई हायकोर्टात मोठा खुलासा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आता वेगळाच ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. सुशांतच्या बहिणी मीतू सिंह आणि प्रियांका सिंह यांच्याविरुद्ध तक्रारीप्रमाणेच एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ने सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच आधारे त्यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे. असं प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. रियाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सुशांतच्या बहिणींवर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीने तक्रार केली आहे की, सुशांतच्या बहिणीने दिल्लीच्या एका डॉक्टरकडून बोगस प्रिस्क्रिप्शन सुशांतसाठी पाठवलं होतं. सुशांतच्या मन:शांतीसाठी ही औषधं पाठवली आहेत अशी बतावणी करुन काही औषधं पाठवण्यात आली होती. पण या औषधांमुळे सुशांतची मानसिक अवस्था बिघडली असा आरोप रियाने केला आहे. ही औषधं घेतल्यामुळेच सुशांतने आत्महत्या केली असावी असा संशय रियाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या