Advertisement

IPL 2020 च्या अखेरच्या सामन्यात मुंबई पराभूत; हैदराबादचा Playoffs मध्ये प्रवेश


IPL 2020 च्या अखेरच्या सामन्यात मुंबई पराभूत; हैदराबादचा Playoffs मध्ये प्रवेश
SHARES

IPL 2020च्या अखेरच्या साखळी सामन्यात हैदराबादनं  मुंबईला १० गडी राखून पराभूत केले आहे. या विजयासह हैदराबादनं 'प्ले-ऑफ्स'मध्ये प्रवेश केला आहे. 'प्ले-ऑफ्स'मध्ये (play off) गुरूवारी मुंबई विरूद्ध दिल्ली तर शुक्रवारी हैदराबाद विरूद्ध बंगळुरू असे सामने रंगणार आहेत. नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादनं (sunrisers Hyderabad) गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळं प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या (mumbai indians) संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. परंतु, कायरन पोलार्डनं ४१ धावा करत मुंबईला १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली होती.

या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दुखापतीनंतर संघात परतलेला कर्णधार रोहित शर्मा ४ धावांवर तर क्विंटन डी कॉक २५ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव (३६) आणि इशान किशन (३३) यांनी चांगली खेळी केली, पण मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले.

कृणाल पांड्या (०) आणि सौरभ तिवारीही (१) झटपट माघारी परतले. अखेर शेवटच्या टप्प्यात कायरन पोलार्डने २ चौकार आणि ४ षटकार खेचत ४१ धावा केल्या आणि संघाला १४९ पर्यंत मजल मारून दिली. हैदराबादकडून संदीपने ३, होल्डर-नदीमने २-२ आणि राशिदने १ बळी टिपला.

१५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांची आक्रमक सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर-प्लेच्या षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत त्यांनी ६ षटकात ५६ धावा केल्या. डावाच्या १२व्या षटकात फिरकीपटू राहुल चहरच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरने षटकार लगावत आपलं अर्धशतक साकारलं. तर त्याच षटकात चौथ्या चेंडूवर साहाने एकेरी धाव अर्धशतक केलं. त्यानंतर वॉर्नरने धावगती वाढवत धमाकेदार नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला. वृद्धिमान साहानेही ७ चौकार आणि १ षटकार लगावत नाबाद ५८ धावा केल्या आणि त्याला चांगली साथ दिली.

आयपीएलचे सर्व साखळी सामने झाले असून, आता उपांत्य फेरीत व अंतिम सामन्यात कोण मजल मारत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 'प्ले ऑफ'च्या पहिल्या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत जाईल. तर पहिल्या सामन्यातील पराभूत संघ दुसऱ्या सामन्यातील विजेत्याशी खेळेल. त्यातून अंतिम फेरीतील दुसरा संघ निवडला जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा