Advertisement

नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे मार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील १००/२२ KV सब स्टेशनचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे मार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील १००/२२ KV सब स्टेशनचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

परिणामी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा संध्याकाळी होणार नाही. तसंच या कालावधीतील महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्याचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसंच गुरुवार ५ नोव्हेंबर  रोजी कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असं आवाहन  नागरिकांना करण्यात आलं आहे.हेही वाचा -

अखेर सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू

मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्कRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा