Advertisement

अखेर सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू

सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव हार्बर सेवा सोमवारपासून सुरू झाली. या मार्गावर एकूण ८६ लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहेत.

अखेर सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) बंद ठेवण्यात आली होती. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना मुंबईची लोकलही रुळावर आली आहे. शिवाय, सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव हार्बर सेवा सोमवारपासून सुरू झाली. या मार्गावर एकूण ८६ लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्वेतून केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. नुकतीच सर्वच महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देताना ठरावीक वेळाही निश्चित केल्या आल्या आहेत. त्यामुळे लोकल गाड्याना काहीशी गर्दी होत आहे. टाळेबंदीत सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव हार्बर सेवा पूर्णपणे बंदच होती. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, कर्जत या मुख्य मार्गावर, सीएसएमटी ते पनवेल या हार्बर मार्गावर (harbour railway) लोकल चालवण्यात आल्या.

ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांची मागणी पाहता काही महिन्यांपूर्वी २ फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर आणखी ४ फेऱ्यांची भर पाडली आणि हळूहळू त्यातही वाढ के ली. मात्र सीएसएमटी ते गोरेगाव मार्ग बंदच होता. परिणामी सीएसएमटी परिसरात कार्यरत असणाऱ्यांना पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकापर्यंत पायपीट करून अंधेरी किंवा गोरेगावसाठी लोकल पकडावी लागत होती.

सर्वासाठी लोकल प्रवासाची तयारी म्हणून रेल्वेकडून हळूहळू लोकल फेऱ्यांत वाढ के ली जात आहे. २ नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेने आणखी ५५२ लोकल फे ऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सात महिन्यांनंतर पुन्हा सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव मार्ग पूर्ववत करण्यात आला. सीएसएमटी ते अंधेरी मार्गावर ४४ लोकल फे ऱ्या आणि सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर ४२ लोकल फे ऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यापाठोपाठ बंद असलेल्या अंधेरी ते पनवेल मार्गावरही १८ फे ऱ्या सोमवारपासून धावू लागल्या आहेत.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा