भेसळयुक्त तेलाची तस्करी करणारे अटकेत

सौदी येथील तेलाच्या कारखान्यावर ड्रोन हल्ला झाल्याने त्याची झळ  भारतातील तेलाच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळेच राष्ट्रीय तेल कंपन्यांतील तेलात भेसळ करून खिसे भरू पाहणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी अटक केली आहे. वाजिद अब्बास अन्सारी (३२), अली शेख (३२), असगर इस्माइल शेख (४९) अशी या तिघांची नावे आहेत.

१४,८०० लिटर तेलाची तस्करी

माहुलच्या बीपीसीएनएल कंपनीतून तेल भरून निघणाऱ्या टँकरमधील तेल काढून त्यात पाण्याची भेसळ करत असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहुल गाव परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या समोर उभ्या असलेल्या तीन टँकरमधील तेलात भेसळ केलं होतं. त्यानुसार तीन ही टँकरची तपासणी करत, त्यातील फर्नेस तेलाचे नुमने हे बीपीसीएलच्या प्रयोगशाळेत पाठवले. तपासात पोलिसांना टँकरच्या तीनपैकी एका कप्प्यात पाणी आढळून आले. त्यानुसार तस्करांनी तब्बल १४,८०० लिटर तेलाची तस्करी केली असून या फसणूक करण्यात आलेल्या फर्नेस तेलाची किंमत ५ लाख १८ हजार इतकी आहे.

टँकर सिलबंद 

मागील अनेक दिवसांपासून हे तिघे अशा प्रकारे तेलाची तस्करी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे टँकरमधून तेलाची चोरी केल्यानंतर हे तिघे बीपीसीएलप्रमाणे टँकर सिलबंद करायचे. या तिघांवर पोलिसांनी आरसीएफ पोलिस ठाण्यात ३७९, ४२०,४६२,४६७,४८४,१२०(ब), भा.द.वि व ३,७ जिवाश्यक वस्तू कायदा १९५५ नुसार गुन्हा नोंदवलेला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

गोवंडीत अल्पवयीन विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या शिक्षकाला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या