'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान

काही दिवसांपूर्वी मुंबईतील काळबादेवी (kalbadevi) परिसरात एका महिलेनं ट्रॅफिक हवालदाराला (traffic constable) भरस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरस झाला होता, तसंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी संबंधित महिलेवर कारवाई मागणी केली होती. या प्रकरणी महिलेला अटकही करण्यात आली. या सर्वप्रकारात ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्टे यांनी संयम ठेवत महिलांचा आदर राखल्यामुळं त्या ट्रॅफिक हवालदाराचा एसीपी (acp) लता धोंडे यांनी भररस्त्यात गाडी थांबवून सत्कार केला.

काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका इथं महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी महिलेलाल बेड्या ठोकल्या आहेत. सादविका रमाकांत तिवारी (३०) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (२६) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील कुलाबा विभाग सहायक पोलीस आयुक्त, लता धोंडे यांनी ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्टे यांचा भरचौकात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महिलेनं भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अनादर करण्यात आला, पण आपण संयम राखला, महिलेचा आदर कायम ठेवला. त्यामुळं, त्याच रस्त्यावर येऊन मी आपला सन्मान करत असल्याचं एसीपी धोडे यांनी म्हटलं. त्याशिवाय, याप्रकरणी सखोल चौकशी करुन आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही आयुक्त धोंडे यांनी दिले आहे. 


हेही वाचा -

आठवड्याभरात मेट्रोची प्रवासी संख्या दुप्पट

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर


पुढील बातमी
इतर बातम्या