Advertisement

आठवड्याभरात मेट्रोची प्रवासी संख्या दुप्पट

मागील आठवड्याच्या अखेरीस हा प्रतिसाद २४ हजारांवर पोहोचला, तर सोमवारी ही संख्या २६ हजार झाली.

आठवड्याभरात मेट्रोची प्रवासी संख्या दुप्पट
SHARES

कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं मागील ७ महिन्यांपासून बंद असलेली घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो १ची सेवा सुरू झाली. सुरूवातील या मेट्रोला प्रवाशांनी कमी प्रतिसाद दिला. परंतू, आता आठवड्याभरातच प्रवासी संख्या दुपटीवर पोहोचली. सोमवारी १९ ऑक्टोबरपासून मेट्रो सेवा पुन्हा सुरू झाली. तसंच, सेवा सुरू झाली तेव्हा पहिल्याच दिवशी सुमारे १३ हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला. मागील आठवड्याच्या अखेरीस हा प्रतिसाद २४ हजारांवर पोहोचला, तर सोमवारी ही संख्या २६ हजार झाली.

लॉकडाऊनपूर्वी एका मेट्रो रेल्वेगाडीतून सुमारे १३५० प्रवासी प्रवास करत होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले. त्यामुळं एका वेळी केवळ ३६० प्रवासी प्रवास करू शकतात. मेट्रो १ मार्गिकेवर व्यवसाय केंद्रांचं प्रमाण अधिक असल्यानं मेट्रोचा प्रतिसाद आठवड्याभरात दुपटीनं वाढला.

नवीन नियमावलीनुसार दिवसाला ७२ हजार प्रवासी अपेक्षित आहेत. मात्र, सध्या उपनगरी रेल्वे सेवेवर अनेक निर्बंध असल्यानं सर्वानाच त्याचा लाभ घेता येत नाही, तर दुसरीकडं कल्याण-डोंबिवली, ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथून अंधेरी भागात कामासाठी येणाऱ्यांना मेट्रोनं प्रवास करायचा असेल तर २ ते ३वेळा वाहन बदलावं लागतं. परिणामी घाटकोपपर्यंत अन्य वाहन आणि नंतर मेट्रोचा प्रवास केल्यानं फारसा वेळ वाचत नसल्याचं अनेक प्रवाशांनी नमूद केलं.

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक ही मोनो सेवा गेल्या रविवारपासून सुरू करण्यात आली. पंरतू, या मोनो सेवेला मात्र अद्याप पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येतं. या सेवेला अद्यापही प्रवाशांचा प्रतिसाद नगण्यच आहे. आठवडा उलटला तरी दिवसाला केवळ ५५० प्रवासीच मोनोचा उपयोग करत आहेत. सध्या या मार्गिकेवर केवळ दोनच रेल्वेगाड्या कार्यरत असल्यानं २ फेऱ्यांमधील वारंवारिता ३० मिनिटांची आहे.

या मार्गिकेची कोणत्याही मुख्य रेल्वे स्थानकाशी जोडणी नसणं. व्यापारी केंद्र नसणं अशा कारणांमुळं या मोनोवर अद्यापही प्रवाशांची संख्या अत्यल्पच आहे. साधारण दिवसाला ३ हजार प्रवासी असतील तरच संचालनाचा खर्च निघू शकतो. मोनो सेवा सुरू झाल्यापासून असा प्रतिसाद फारच कमी वेळा मिळाला आहे, असं एमएमआरडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

सर्वांसाठी सुरु होणार मुंबई लोकल?

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा