Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

सर्वांसाठी सुरु होणार मुंबई लोकल?

लवकरच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सर्वांसाठी सुरु होणार मुंबई लोकल?
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (Mumbai local) बंद करण्यात आली होती. परंतु, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं लोकल सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर हळूहळू इतर सरकारी व लोकल प्रवासाची अवशक्यता असलेल्या प्रवाशांनाही (passengers) लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. विशेषतः काहीच दिवसांपूर्वी सरसकट महिलांना ही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. अशातच आता लवकरच  सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

ट्विटरवर एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. एका प्रवाशाने ट्विट करत, 'याआधी महिलांना लोकलने (local) प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे', अशी खंत व्यक्त केली.

याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी, 'पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ' असं सांगितलं. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असंही त्यांनी म्हटलं. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती दिली होती. याआधी विजय वडेट्टीवार यांनी महानगर प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रवासाची सर्वाना मुभा देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.हेही वाचा -

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद- चंद्रकांत पाटील


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा