Advertisement

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा

कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेन्मेंट झोनमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लाॅकडाऊन सक्तीचाच राहील, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवार २७ आॅक्टोबर २०२० रोजी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा
SHARES

देशभरातील विविध राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने अनलाॅकची प्रक्रिया सुरू असली, तरी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेन्मेंट झोनमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लाॅकडाऊन सक्तीचाच राहील, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवार २७ आॅक्टोबर २०२० रोजी स्पष्ट केलं आहे.  

केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी कोरोनासंदर्भातील पुढील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार रिओपनिंगबाबत ३० सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (as per new guidelines of ministry of home affairs lockdown will continue in containment zones in india)

महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ३१ आॅक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आलं असलं, तरी राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक सेवा सुविधांना अटी शर्थींच्या आधारे परवानगी दिली आहे. सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास सरसकट सर्व महिलांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्याशिवाय वकील, डबेवाले, खासगी सुरक्षा रक्षक अशा काही सेवांमधील कर्मचाऱ्यांना विशेष परवानगीने रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. 

राज्यांतर्गत रेल्वेसोबतच मेट्रो आणि मोनो सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. राज्यातील हाॅटेलांसोबतच रेस्टाॅरंट आणि बार, जीम व्यावसायिकांना दिलासा देत हे व्यवसाय सुरू करण्यासही मुभा देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु सध्या विरोधकांचा मंदिरे सुरू करण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. यामुळे येत्या अनलाॅकच्या घोषणेत राज्य सरकार धार्मिक स्थळं आणि सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देते का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा