Advertisement

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात आण्यात यश आलं आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात आण्यात यश आलं आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत पालिका क्षेत्रात कोरोनाचे ९३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. चार दिवसांपूर्वी हे प्रमाण ९१ टक्के होतं.

ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधीही तब्बल १६५ दिवसांवर गेला आहे. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी १३५ दिवस होता. येथील मृत्युदर २.४९ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण ९.७४ टक्क्यांवर आलं आहे.

जुलै महिन्यात महापालिका हद्दीत रोज सरासरी ३५२ रुग्ण आढळत होते. ऑगस्ट महिन्यात हा आकडा २०० होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली होती. सप्टेंबरमध्ये रोज सरासरी ३६२ रुग्ण आढळत  होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा घटू लागली असून दररोज सरासरी दीडशे ते दोनशे रुग्ण आढळून येत आहेत.

चार दिवसांपूर्वी ठाणे पालिका क्षेत्रात रुग्णदुपटीचा कालावधी १३५ दिवसांचा होता. त्याआधीच्या सात दिवसांपूर्वी हा कालावधी ७७ दिवस होता.  रुग्णदुपटीच्या कालावधीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त दररोज होणाऱ्या चाचण्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.९४ टक्क्यांवरून ९.७४ टक्क्यांवर आलं आहे.



हेही वाचा - 

कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा