Advertisement

कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम


कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम
SHARES

अहवालांनुसार, प्रौढांमध्ये कोरोनाव्हायरसशी निगडीत एक गुंतागुंत आढळली आहे ज्याला मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम (एमआयएस-सी) म्हणतात, जो आधी मुलांमध्ये दिसला होता.

या सिंड्रोममध्ये, हृदय, यकृत, मूत्रपिंड, रक्तवाहिन्या इत्यादींसह अवयव आणि उती याला सूज येऊ शकते. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात या सिंड्रोमची पहिली घटना समोर आली आहे. या ५२ वर्षीय महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत.

याआधी, आश्चर्यकारक घटनेत मुंबईत कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या तरुण रूग्णांमध्ये कावासाकी रोगासारखीच लक्षणं आढळली. पूर्वी, लहान मुलांमध्येही अशीच लक्षणं पाहिली गेली होती.

जगभरात, कोरोनाव्हायरस मानवी शरीरावर कसा परिणाम करीत आहे याची तपासणी करण्यासाठी डॉक्टर, संशोधक आणि वैज्ञानिक सतत चोवीस तास कार्यरत असतात. आतापर्यंत, आम्हाला माहित आहे की, एखादे प्रकरण जितके गंभीर असेल तितके आजारपणाचा कालावधी बराच असतो.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा