राजगृहाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना कोरोना

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची काही दिवसांपूर्वी दोन माथेफिरूनी तोडफोड केली होती. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी मोठ्या शर्तीने दोन आरोपींना अटक केली. मात्र या दोघांना कोरोना झाल्याचे पुढे आले असून त्यांना सध्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचाः- मुंबईत शनिवारपासून २० टक्के पाणीकपात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची या दोन्ही आरोपींनी तोडफोड केली होती. याप्रकरणी एका आरोपीला ८ जुलै रोजी तर दुसऱ्याला २२ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याच दरम्यान माटुंगा पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र तात्काळ त्या पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यात आले. हे सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. यातील काही कर्मचारी हे ड्युटी दरम्यान या आरोपींच्या सहवासात होते. त्यामुळे या आरोपींना देखील कोरोना झाला असवा, असा संशय होता. त्यामुळे या दोघांची स्वॅब टेस्ट केली असताना त्याचा रिपोर्ट हा नुकताच आला. त्यात या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आम्ही त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पाठवलं आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या