Advertisement

Uddhav Thackeray: राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही- उद्धव ठाकरे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह निवासस्थान महाराष्ट्रातील तमाम जनतेचं तीर्थक्षेत्रच आहे. त्यामुळे राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही- उद्धव ठाकरे
SHARES

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह निवासस्थान महाराष्ट्रातील तमाम जनतेचं तीर्थक्षेत्रच आहे. त्यामुळे राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. पोलिसांना दोषींवर कडक कारवाई करण्याचे (cm uddhav thackeray directs police to take strict action against unidentified persons who stone pelting at dr br ambedkar house rajgruha) आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचं श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह'वर दगडफेक, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील दादर, हिंदू कॉलनी इथं राजगृह निवासस्थान आहे. या निवासस्थानावर मंगळवारी उशीरा रात्री काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ अज्ञात व्यक्ती इमारतीच्या आवारात शिरल्याचं दिसत आहे. इमारतीच्या आवारात शिरल्यावर घराबाहेरील कुंड्यांची आणि घरांच्या काचांची तोडफोड त्यांनी केली. एवढंच नाही तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

याप्रकरणी माटुंगा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीनं घटनास्थळावर दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपुर्द केले. राजगृह निवासस्थानी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचं मोठं संग्रहालय आहे. राज्यातून आणि देशभरातून मुंबईत येणारे बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी राजगृहला भेट देत असतात. 

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं एक पत्रक काढत या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. ज्या माथेफिरूंनी हल्ला केला त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवं, अशी मागणी वंचितने केली आहे. यासोबतच त्यांनी कार्यकर्त्यांना आणि आंबेडकरी अनुयायांना शांत राहण्याचं आवाहन देखील आंबेडकर यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा