क्लास वन अधिकाऱ्याने लाच म्हणून स्वीकारल्या दोन साड्या

सोसायटीच्या दुरुस्तीसाठी सिंकीग फंड वापरण्यास परवानगी देण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने मालाडमधील एका सोसायटीच्या चेअरमनकडून लाच म्हणून चक्क साड्या स्विकारल्याचे उघडकीस आलं आहे. त्यासोबत त्याने २ लाखांची मागणी देखील केली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) गुन्हा दाखल केला  असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचाः- वर्षभरानंतर पुन्हा पवार-राऊत भेट, चर्चांना उधाण

मालाड पश्चिम येथील एसव्ही रोड येथील एका रहिवाशी सोसायटीच्या इमारतीचे दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी सिंकींग फंड वापरता यावा. यासाठी सोसायटीच्या वतीने त्यांनी कांदिवली पूर्व येथील उपनिबंधक सहकारी संस्था येथे लेखी अर्ज केला होता. ती मागणीपूर्ण करण्यासाठी सहकार अधिकारी श्रेणी-१ याने दोन लाख रुपयांची मागणी केली. तसे न केल्यास सोसायटीला डिफॉल्टर घोषीत करून कमीटी बरखास्त करण्याची नोटीस बजावण्याची धमकी दिली. त्यांनी पुन्हा संपर्क केला असता.  उपनिबंधक सहकारी संस्था येथील सहकार अधिकारी श्रेणी-१ भरत काकड यांनी दोन लाख व दोन साड्यांची मागणी केली.

हेही वाचाः- शिवसेना प्रवेशावर उर्मिला मातोंडकर म्हणाल्या...

लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे अखेर सोसायटी चेअरमनने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने तपासणी केली असता अधिका-याने दोन लाख रुपये व दोन साड्या मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला असता काकड यांना खासगी कार्यालयात दोन लाख रुपये स्वीकारताना व त्यांचा मुलगा सचिन काकड याला दोन साड्या स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले

पुढील बातमी
इतर बातम्या