Advertisement

शिवसेना प्रवेशावर उर्मिला मातोंडकर म्हणाल्या...

शिवसेनेतील प्रवेशाबद्दल उर्मिला मातोंडकर मंगळवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना प्रवेशावर उर्मिला मातोंडकर म्हणाल्या...
SHARES

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत (shiv sena) प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. परंतु अद्याप उर्मिला मातोंडकर यांच्याकडून यावर काहीही प्रतिक्रिया न आल्याने सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलं आहे. त्यावर पत्रकार परिषद घेऊन त्या स्वत: उत्तर देणार असल्याचं समजत आहे.

उर्मिला मातोंडकर मंगळवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी प्रसारमाध्यमांना निमंत्रीत केलं आहे. 

हेही वाचा- उर्मिला मातोंडकर करणार शिवसेनेत प्रवेश?

त्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना, शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर या शिवसैनिकच आहेत. बहुदा त्या उद्या शिवसेनेत प्रवेश करतील, त्यांच्या पक्षात येण्याने महिला आघाडी मजबूत होईल, असं वक्तव्य केलं होतं. 

त्यामुळे अवघ्या वर्षभराआधी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवून पुढच्या काही दिवसांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. 

शिवसेना विरूद्ध कंगना अशा वादात उर्मिलाने अप्रत्यक्षरित्या शिवसेनेची भूमिका मांडल्याने शिवसेना पक्षनेतृत्वाने त्यांना पक्षात योग्य संधी देण्याचं ठरवलं असं म्हटलं जात आहे. त्यानुसार विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेने त्यांच्या नावाची शिफारस केली. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्यासोबत चर्चा केली होती. आता शिवसेनेकडून सक्रिय राजकारणात उतरवण्यासाठी उर्मिया यांना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

(actress urmila matondkar will conduct press conference about joining shiv sena)

हेही वाचा- यासाठीच उद्धव ठाकरेंनी माझी नेमणूक केलीय- संजय राऊत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement