Advertisement

वर्षभरानंतर पुन्हा पवार-राऊत भेट, चर्चांना उधाण

संजय राऊत यांनी सोमवारी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

वर्षभरानंतर पुन्हा पवार-राऊत भेट, चर्चांना उधाण
SHARES

परस्पर विचारधारेच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करत भाजपला मोठा धक्का दिला. त्याला एक वर्षाचा कालावधी उलटला. या सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच एकमेकांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं.

संजय राऊत यांनी सोमवारी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. या भेटीची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांचा कामाचा उरक व उत्साह थक्क करणारा आहे. संकटं व असंख्य वादळात त्यांचं नेतृत्व खंबीरपणे ऊभं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचा- शिवसेना प्रवेशावर उर्मिला मातोंडकर म्हणाल्या...

महाविकास आघाडीचं सरकार (shiv sena-congress-ncp) म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. या सरकारमध्ये प्रचंड आंतरर्विरोध आहेत. एकमेकांच्या कुरघोड्या करण्यातच या सरकारमधील नेते गुंतलेले आहेत. त्यामुळे हे सरकार फारकाळ टिकणार नाही. ते कुठल्याही क्षणी स्वत:हूनच कोसळेल, अशी भाकीतं सातत्याने भाजप नेत्यांकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडीने कोरोना संकट, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि विरोधकांचे हल्ले याचा सामना करत वर्ष पूर्ण केलं आहे.

सरकारमध्ये कुरबुरी झाल्यास किंवा कुठल्याही पेचप्रसंगात शरद पवार पुढं होऊन समन्वय साधण्याचं काम करताना दिसत आहेत. त्यामुळे  सरकारचे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत? हे सरकार कोण चालवतंय उद्धव ठाकरे की शरद पवार असा प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतो.

(shiv sena mp sanjay raut meets ncp chief sharad pawar after maha vikas aghadi government completes 1 year)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा