इक्बाल कासकरची पुन्हा तुरुंगात रवानगी

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

खंडणीच्या गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर (५६) याला सोमवारी रात्री जे. जे. रुग्णालयात दाखल केलं होतं. इक्बालच्या छातीत दुखू लागल्यामुळे कारागृह पोलिसांनी उपचारासाठी त्याला रुग्णालयात आणलं होतं. दरम्यान वैद्यकीय तपासणी पार पडल्यानंतर इक्बालची प्रकृती स्थिरावली त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी त्याची रवानगी पुन्हा ठाणे कारागृहात केली आहे.

पुन्हा ठाणे कारागृहात रवानही

सोमवारी सायंकाळी इक्बाल कारागृहात बसला असताना अचानक त्याच्या छातीत आणि डोके दुखू लागलं. त्यावेळी इक्बालने कारागृहातील पोलिसांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत कळवलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी इक्बालला तपासलं, मात्र कारागृहात अपुऱ्या साहित्याअभावी इक्बालवर उपचार करणे शक्य नाही. त्याचबरोबर ऐवढ्या महत्वाच्या आरोपीबाबत डॉक्टर कोणतीही जोखिम नको म्हणून इक्बालला तातडीने जे. जे. रुग्णालयात हलवण्याचं ठरवलं. 

रात्री ९ च्या दरम्यान इक्बालला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केलं. रात्रभर इक्बालवर उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिरावल्यानंतर डॉक्टरांच्या संमतीने पोलिसांनी मंगळवारी पहाटेत इक्बालला पुन्हा ठाणे कारागृहात नेलं.


हेही वाचा - 

अखेर दाऊद इब्राहिम विरोधात मुंबईत गुन्हा दाखल!

'भाई की बोली सून, नहीं तो गोली मिलेगी' - इक्बाल

पुढील बातमी
इतर बातम्या