अखेर दाऊद इब्राहिम विरोधात मुंबईत गुन्हा दाखल!


अखेर दाऊद इब्राहिम विरोधात मुंबईत गुन्हा दाखल!
SHARES

इक्बाल कासकर खंडणी प्रकरणात अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. ३ कोटींच्या या खंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमसह त्याचा भाऊ अनिस इब्राहिम आणि इक्बाल कासकरला आरोपी बनवण्यात आले आहे. एकाच गुन्ह्यात दाऊद बंधूंचं नाव असलेला हा पहिलाच गुन्हा आहे.


काय आहे प्रकरण?

गोराई येथील जमीनदाराने(लँडलॉर्ड) त्याच्या ३८ एकरांच्या जागेचा एका बिल्डरशी सौदा केला होता. बिल्डरने २ कोटींची टोकन रक्कम देखील जमीनदाराला दिली. मात्र, वर्ष लोटलं तरी दोघांमध्ये सौदा होऊ शकला नव्हता. त्यानंतर किंमती वाढल्याचं सांगत जमीनदाराने बिल्डरकडून दुप्पट रकमेची मागणी सुरु केली. मात्र हे ऐकण्यास बिल्डर तयार नव्हता.


कसा आला इकबाल कासकरचा संबंध?

बिल्डर ऐकत नसल्याचं पाहून जमीनदाराने इक्बाल कासकरची मदत घेतली. इक्बालने बिल्डरशी संपर्क करून आता ही जागा त्याने घेतल्याचं सांगितलं. या पुढे कोणताही सौदा होऊ शकत नाही, असं देखील त्याने बिल्डरला बजावलं. या संपूर्ण प्रकरणात कासकरने जमीनदाराकडून एकूण ३ कोटी रुपये घेतल्याचा दावा ठाणे खंडणी विरोधी पथकाने केला आहे.


दाऊदवर गुन्हा का?

यावेळी बिल्डरला धमकावण्यासाठी दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनिस इब्राहिम या दोघांच्या नावाचा वापर झाल्याने या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

खंडणीच्या या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत इक्बाल कासकरवर तीन गुन्हे, तर दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनिस इब्राहिम आणि दाऊदचा राईट हॅन्ड छोटा शकीलवर प्रत्येकी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



हेही वाचा

खंडणी प्रकरणात छोटा शकील देखील आरोपी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा