दाऊद इब्राहिमची पुन्हा अंजली दमानियांना धमकी?


दाऊद इब्राहिमची पुन्हा अंजली दमानियांना धमकी?
SHARES

आपच्या नेत्या अंजली दमानिया आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यातला वाद पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह आहेत. एकनाथ खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची धमकी पाकिस्तानमधून आलेल्या एका फोनकॉलवर देण्यात आल्याची माहिती आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली असून त्यांनी जॉइंट कमिशनर क्राईम यांना या प्रकरणात चौकशीचे आदेशही दिले आहेत.


'त्या' क्रमांकाचं गूढ!

प्रीती शर्मा मेनन यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार शनिवारी पहाटे अंजली दमानिया यांना फोनवरुन ही धमकी देण्यात आली होती. +92 21 35871719 या पाकिस्तानातील क्रमांकावरुन हा धमकी देणारा फोन कॉल आल्याचा दावा या परिपत्रकात करण्यात आला आहे.


'तो' क्रमांक दाऊदच्या पत्नीचा?

याआधीही अशाच प्रकारे फोनवरुन धमकी आल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला होता. त्यावेळी हा क्रमांक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन शेखच्या नावे नोंद असून पाकिस्तानातील कराचीचा असल्याचा दावा हॅकर मनीश भंगालेने केला होता. त्यासाठी पाकिस्तानी टेलिकम्युनिकेशन कंपनीकडून या विशिष्ट क्रमांकाचे डिटेल्सही देण्यात आले होते. +92 21 35871719 या क्रमांकावरुन एकनाथ खडसे यांच्या क्रमांकावर वारंवार फोनकॉल केल्याचा दावा करण्यात आला होता.



'तपास राष्ट्रीय संस्थांकडूनच करा'

दरम्यान, याआधीच्या धमकी प्रकरणी अवघ्या चार तासांमध्ये तत्कालीन जॉईंट कमिशनर क्राईम अतुलचंद्र कुलकर्णी यांनी एकनाथ खडसेंना क्लिनचिट दिली होती. त्यामुळे आताही त्यांच्याकडून चांगल्या चौकशीची अपेक्षा कशी ठेवणार? असा सवालही आपकडून विचारण्यात आला आहे. त्यामुळ या प्रकरणाची रॉ, एनआयए किंवा आयबी अशा राष्ट्रीय तपास संस्थांकडूनच चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपने केली आहे. तसेच, अंजली दमानिया आणि त्यांच्या कुटुंबियांना त्वरित पोलिस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.



हेही वाचा

अखेर खडसेंविरोधात गुन्हा दाखल, पण तपास होणार जळगावात

भुजबळांनी पाठवली दमानियांना अब्रुनुकसानीची नोटीस


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा