छगन भुजबळ यांना जेलमध्ये पंचतारांकित सुविधा - अंजली दमानियांचा आरोप

Mumbai
छगन भुजबळ यांना जेलमध्ये पंचतारांकित सुविधा - अंजली दमानियांचा आरोप
छगन भुजबळ यांना जेलमध्ये पंचतारांकित सुविधा - अंजली दमानियांचा आरोप
See all
मुंबई  -  

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा खळबळजनक आरोप करत भुजबळ यांना आर्थर रोड जेलमध्ये पंचतारांकित सुविधा मिळत असल्याचे म्हटले आहे. दमानिया यांनी याप्रकरणी अतिरिक्त कारागृह संचालक भूषण उपाध्याय यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रारही केली आहे.

अंजली दमानिया यांनी पाठवलेल्या ई-मेलमध्ये दावा केला आहे की, छगन भुजबळ यांना त्यांच्या सेलमध्ये खास टी.व्ही. देण्यात आला आहे. त्यांना खाण्यात चिकन मसाला हा आवडीचा पदार्थ दिला जातो. प्रत्येक दोन तासाला फळे पुरविले जातात. तर समीर भुजबळ यांना नारळ पाण्याच्या नावावर व्होडाका पुरवली जाते.

आर्थर रोड जेलमध्ये मोबाइल जॅमर लावलेला असला, तरी समीर भुजबळ यांना फोनवर बोलण्यासाठी खास जागा दिली जाते. तिथे समीर भुजबळ सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास बोलत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी याअाधी केलेल्या तक्रारीनंतर जोशी नावाच्या अधिकाऱ्याला छगन भुजबळ यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केले होते. मात्र हा अधिकारीच भुजबळ यांची मदत करु लागला आहे. छगन भुजबळ यांना कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन वेळोवेळी सूट दिली जाते, याचे पुरावेही वारंवार दिले गेले आहेत.

पंकज भुजबळ यांनी ईडीच्या सुनावणीवेळी सरकारी साक्षीदारांनाही धमकी दिली होती. इतक्या महत्वाच्या खटल्यामध्ये पोलिसांनी दक्ष राहण्याची गरज आहे. मात्र तशा प्रकारची दक्षता कुठेही दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारे तक्रार करावी लागत असल्याचे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.