अखेर खडसेंविरोधात गुन्हा दाखल, पण तपास होणार जळगावात


अखेर खडसेंविरोधात गुन्हा दाखल, पण तपास होणार जळगावात
SHARES

जळगाव येथील सभेदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अखेर भाजपाचे जेष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु हा प्रकार जळगावमध्ये घडल्याचं सांगत पोलिसांनी हे प्रकारण जळगाव पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केलं आहे.



काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असताना खडसेंची जीभ घसरली आणि त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर तोंडसुख घेतल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता.


काय म्हणाले होते खडसे? बघा -


या भाषणाचा व्हिडीयो मिळताच दमानिया यांनी थेट वाकोला पोलीस ठाणे गाठत खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण वाकोला पोलिसांनी पुरावे पाहूनही गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. हा प्रकार जळगावमध्ये झाल्यानं मुंबईत गुन्हा नोंदवण्यात येणार नाही, असं कारण पोलिसांनी त्यांना दिलं होतं.



हे देखील वाचा -

नाथाभाऊंचा 'भुजबळ' करणं मनोरंजनाचा विषय - एकनाथ खडसे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा