इक्बालच्या पार्ट्यांनी दाऊदचा 'भेजा फ्राय'!


इक्बालच्या पार्ट्यांनी दाऊदचा 'भेजा फ्राय'!
SHARES

आजपर्यंत असंख्य अभिनेते, बिल्डर्स आणि व्यापाऱ्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, त्यांची झोप उडवणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम स्वतः च्याच भावापुढे हतबल झाला होता, हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.   

पाकिस्तानात बसून भारतासह इतरत्र खंडणी आणि तस्करीचं साम्राज्य चालवणारा दाऊद आपला भाऊ इक्बालला लागलेल्या वाईट सवयी आणि ऐय्याशीनं त्रस्त झाला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल कासकरला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. इक्बालला "भेजा फ्राय" खाण्याची विशेष आवडत असल्यानं तो आपल्या घरी नेहमी 'भेजा फ्राय'ची मेजवानी ठेवायचा. ज्या नगरसेवकांचं इक्बालच्या खंडणी रॅकेटमध्ये नाव आलं आहे, त्यांनी देखील या 'भेजा फ्राय' पार्ट्यांना हजेरी लावल्याचं समोर आलं आहे.

१८ ऑगस्टला ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी इक्बालला बिल्डरकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्या चौकशीत मुंबई, ठाण्याचे बिल्डर्स आजही कशा प्रकारे दाऊदच्या सावटाखाली रहात आहेत, हे समोर आले.



हे देखील वाचा -

मुंबई, ठाण्यात अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय?

खंडणी प्रकरणात अनिस इब्राहिम देखील सामील - ठाणे पोलीस

खंडणी प्रकरणात इक्बाल कासकरसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा