खंडणी प्रकरणात अनिस इब्राहिम देखील सामील - ठाणे पोलीस


खंडणी प्रकरणात अनिस इब्राहिम देखील सामील - ठाणे पोलीस
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीप्रकरणी अटक झाल्यानंतर आता त्याच्या चौकशीत अनेक गूढ उकलली जात आहेत. इक्बाल कासकर हा सतत दाऊदचा दुसरा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

इक्बाल कासकर तसेच त्याचे इतर साथीदार हे देखील इक्बाल आणि अनिस इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या खंडणी रॅकेटमध्ये अनिस इब्राहिमचा हात असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोमवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकरला बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती. इक्बालला अटक करताच अनेक खबरींनी ठाणे पोलिसांना फोन करून आणखी माहिती देण्यासाठी पुढे आल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.

एवढेच नाही तर इक्बाल कासकरने धमकावलेले काही बांधकाम व्यावसायिक देखील पुढे येत असल्याचे ठाणे पोलिसांनी म्हटले आहे.


कशी होती इक्बाल कासकरची मोडस ऑपरेंडी?

इक्बाल कासकरची गँग वादात अडकलेल्या जागा हेरत असे. त्यानंतर इक्बालचे साथीदार मुमताज आणि इसरार बांधकाम व्यावसायिकांना धमकावत आणि त्यांचे बोलणे थेट इक्बाल कासकरशी करून देत असत.

बऱ्याच केसेसमध्ये दाऊदच्या नावाची थेट धमकी दिल्याचे पोलिसांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. सोमवारी या प्रकरणी इक्बाल कासकरचे साथीदार मुमताज आणि इसरारलादेखील अटक करण्यात आली होती.


हेही वाचा - 

खंडणी प्रकरणात इक्बाल कासकरसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा