खंडणी प्रकरणात इक्बाल कासकरसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात?


खंडणी प्रकरणात इक्बाल कासकरसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात?
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांचाही हात असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण प्रकरणात दोघा नगरसेवकांसह एका नेत्याचे नाव समोर आल्याची कबुली ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली असली तरी हे नगरसेवक कोण आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत? हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.

आतापर्यंतच्या चौकशीत खंडणीखोरांना इतर बिल्डर तसेच स्थानिक नेते मंडळी मदत करत असल्याचेही चौकशीत समोर आल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात दोन नगरसेवक तसेच एका नेत्याचा संबंध असल्याचे समोर आले आहे. आमचा तपास सुरु असून योग्य वेळी योग्य कारवाई केली जाईल, असे ठाणे पोलिसांकड़ून सांगण्यात आले आहे.



हे देखील वाचा -

मुंबई, ठाण्यात अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा