दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक


दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलात पुनरागमन करताच धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच कारवाईत त्यांनी दाऊदच्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी रात्री केलेल्या कारवाईमध्ये त्यांनी इक्बाल कासकरला खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने वादात असलेली एक जागा विकसित करण्यास सुरुवात केली होती. या कामात कोणाचा अडथळा नको म्हणून त्याने इक्बाल कासकरला देखील भागीदार बनवले. या बदल्यात चार फ्लॅट देण्याचे ठरले होते. पण इक्बाल कासकरने सहा फ्लॅट मागण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते. बांधकाम व्यावसायिकाने याला नकार दिला. त्यामुळे त्याला वारंवार धमकी देण्यात येत होती. शेवटी बांधकाम व्यावसायिकाने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 



हसीना पारकरच्या घरून अटक
काहीच दिवसांपूर्वी इक्बाल कासकर रहात असलेल्या इमारतीच्या शेजारील इमारत कोसळली होती. या दुर्घटनेनंतर इक्बाल कासकरवर देखील त्याचे घर सोडण्याची वेळ आली होती. काही दिवसांपासून इक्बाल हा आपल्या बहिणीच्या म्हणजेच हसीना पारकरच्या घरी थांबला होता. जिथून त्याला सोमवारी रात्री ठाणे खंडाणी विरोधी पथकाने अटक केली.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा