खंडणी प्रकरणात छोटा शकील देखील आरोपी


खंडणी प्रकरणात छोटा शकील देखील आरोपी
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे खंडणी मागितल्याप्रकरणी दाऊदचा 'राईट हँड' छोटा शकील यालादेखील ठाणे खंडणीविरोधी पथकाने आरोपी बनवले आहे. पोलिसांनी आधीच दाऊद भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली आहे. इक्बालला बुधवारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दाऊदचा सर्वात जवळचा साथीदार अशी छोटा शकीलची ओळख आहे. डी. कंपनीचे सगळे व्यवहार सध्या तोच सांभाळत आहे. पोलीस चौकशीत इक्बाल शकीलच्या थेट संपर्कात असून त्याच्या इशाऱ्यावरच हे संपूर्ण खंडणी रॅकेट सुरु असल्याचे समोर आले.

त्यामुळे या प्रकरणी छोटा शकीलला देखील आरोपी बनवण्यात आल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. सध्या छोटा शकील हा दाऊदसह पाकिस्तानात लपून बसला असून तेथूनच तो डी. कंपनीचे व्यवहार सांभाळत आहे.

डी. कंपनी भारतातील हस्तकांशी बोलण्यासाठी 'बर्नर फोन'चा वापर करत असल्याने त्यांचे कॉल्स तपास यंत्रणा पकडू शकत नसल्याची माहिती इक्बालने पोलिसांना दिली होती.

ठाणे खंडणी विरोधी पथकाने १८ सप्टेंबरला इक्बाल कासकरला बिल्डरकडून खंडणी वसूल केल्या प्रकरणी अटक केली होती. सध्या ठाणे पोलीस आणि तपास यंत्रणा इक्बालची चौकशी करत असून या प्रकरणी दाऊदचा सहभाग आल्यास त्याला देखील आरोपी बनवण्यात येईल, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा -

'भाई की बोली सून, नहीं तो गोली मिलेगी' - इक्बाल

इक्बालच्या पार्ट्यांनी दाऊदचा 'भेजा फ्राय'!

मुंबई, ठाण्यात अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा