अखेर छोटा शकील, इक्बाल कासकरला 'मोक्का'


अखेर छोटा शकील, इक्बाल कासकरला 'मोक्का'
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊइक्बाल कासकरवर अखेर ठाणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. इक्बालसह अन्य ६ जणांवरही ठाणे पोलिसांनी 'मोक्का' लावला आहे.


'यांना'ही लागला मोक्का

यांत इक्बालसह छोटा शकील, मुमताज शेख, ईस्रार सय्यद, पंकज गंगर, गुड्डू आणि शमी यांचा समावेश आहे. यातील छोटा शकील, शमी आणि गुड्डू हे फरार असून इतर चौघांना खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली होती. मोक्का लागल्याने इक्बालच्या जामिनावर बाहेर येण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.


काय आहे प्रकरण?

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी १८ सप्टेंबरला इक्बालला एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बिल्डर्सकडून दाऊदच्या नावावर खंडणी वसूल केली जात असल्याचं सत्य समोर आलं.


दाऊदवरही गुन्हा

इक्बालच्या चौकशीत त्याने आणखी काही बिल्डर्सकडून खंडणी वसूल केल्याचं समोर आल्याने त्याच्यावर आणखीन दोन गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये दाऊद इब्राहिमसह त्याचा भाऊ अनिस इब्राहिम आणि दाऊदचा राईट हॅन्ड छोटा शकिलला देखील आरोपी बनवण्यात आलं.



हेही वाचा -

'तय्यारी शुरू करो!', दाऊद आखतोय मुंबईवर हल्ल्याचा कट?

पल्लवी पुरकायस्थचा मारेकरी दीड वर्षांनी गजाआड



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)   

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा