'तय्यारी शुरू करो!', दाऊद आखतोय मुंबईवर हल्ल्याचा कट?


SHARE

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मुंबईवर आणखी एक हल्याचा कट आखत असल्याच्या शक्यतेनं देशभरातील सुरक्षा यंत्रण सतर्क झाल्या आहेत. भारतीय गुप्तचर संस्था तसेच मुंबई गुन्हे शाखेनं २८ सप्टेंबरला पाकिस्तानातील दोन मोबाईल नंबर ट्रॅक केले आहेत. त्यात दाऊद आणि त्याचा भाऊ अनिस इब्राहिम मुंबईत मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे. या संभाषणात "तय्यारी शुरु करो" असं वाक्य असल्यानं सुरक्षा यंत्रणा आणखीच सावध झाल्या आहेत.


मुंबई पोलीस सज्ज

भलेही मुंबईला उद्देशून कुणाकडूनही थेट धमकी आलेली नसली, तरीही मुंबई पोलीस प्रत्येक परिस्थितीशी निपटण्यास तयार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी यासंदर्भात दिलीय.


एकाच नंबरवर तीन काॅल्स

सूत्रांच्या माहितीनुसार दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमनं हे कॉल्स मुंबईतील आपल्या खास हस्तकांना केले होते. एकाच दिवशी दोन मोबाईल नंबरवर तीन वेळा कॉल आल्याचं समजतंय.


कोडवर्ड, अंडरग्राऊंड व्हा

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार अनिस इब्राहिमच्या कॉलमध्ये 'कोडवर्ड'चा वापर करण्यात आला आहे. त्यात अंडरवर्ल्डशी जोडलेल्या सगळ्यांनाच अंडरग्राउंड होण्यास देखील सांगण्यात आलं आहे.


अंडरवर्ल्डचे नंबर ट्रॅकिंगवर

खंडणी प्रकरणात इक्बाल कासकरच्या अटकेनंतर अंडरवर्ल्डशी जोडलेल्या अनेकांचे नंबर ट्रॅकिंगवर टाकण्यात आले आहेत. त्याच दरम्यान ही माहिती समोर आली आहे. त्यातील एक नंबर 0092300728xxx हा असल्याचं सांगितलं जातंय. या नंबरवरून भारतातील नंबरवर एकूण ११ मिनटं बोलणं झाल्याचं समजतंय.


चौकशी सुरू

डी. कंपनी शहरात घातपाताच्या तयारीत असल्याचं समजताच मुंबई पोलिसांच्या हालचालींना वेग आला आहे. अंडरवर्ल्डवरच्या लोकांची चौकशी मुंबई गुन्हे शाखेने सुरु केली आहे. गुन्हे शाखेने बुधवारी मीर आरिफ अली बैग, तारिक परवीन आणि ओमर बाबा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. आरिफ भाईजान, सलीम कुरेशी, अल्ताफ खान मोहम्मद जुनेद खात्री, हनीफ मोटा यांची याआधीच चौकशी करण्यात आली आहे. यातील काही दाऊदचे नातेवाईक तर काही त्याचे जवळचे हस्तक आहेत.

गेल्या महिन्याभरापासून मुंबई पोलीस या सगळ्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन आहे.हेही वाचा -

 या 'कोडवर्ड'ने संवाद साधते डी. कंपनी

इक्बालच्या पार्ट्यांनी दाऊदचा 'भेजा फ्राय'!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय