या 'कोडवर्ड'ने संवाद साधते डी. कंपनी


या 'कोडवर्ड'ने संवाद साधते डी. कंपनी
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीत दिवसागिणक नवनवीन खुलासे होत आहेत. इक्बालकडून डी. कंपनीच्या 'कोडवर्ड' (सांकेतिक शब्द)ची माहिती मिळवण्यात तपास यंत्रणांना यश आले असून या 'कोडवर्ड'द्वारे अनेक संभाषणांचा तपशील तपास यंत्रणांना कळण्यास मदत होणार आहे.


असे आहेत 'कोडवर्ड'-

दाऊद इब्राहिम :बडे

छोटा शकील :पाव टकला किंवा सीएस

इक्बाल :सेठ

माहिती :पर्फ्युम

सावज : पेशंट

धमकी देणे :हाथ लागा दो

हत्या :धक्का देके आगे बढा दो

खंडणीची रक्कम :खोका (कोटी )

डब्बा :(लाख)

पैसे :डायरी

पासपोर्ट :पुठ्ठा

शुटर :कारीगर  

पोलीस : गंदे लोग  

हत्यार :चप्पल (३२, २२,९ कॅलीबर नुसार)

चालक :हमाल

अशा सांकेतिक भाषेचा डी. कंपनी आजवर देशभरातील त्यांच्या कारवायांसाठी वापर करत असल्याची माहिती इक्बाल कासकरने तपास यंत्रणांना दिली आहे.

या 'कोडवर्ड'च्या उलगड्यानंतर अंडरवर्ल्डवर अंकुश ठेवण्यास तपास यंत्रणांना मदत मिळेल, असा विश्वास ठाणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठाणे खंडणीविरोधी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी इक्बालला अटक केली असली, तरी सध्या आयबी देखील त्याची चौकशी करतेय.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा