विजय मल्ल्या प्रत्यार्पण: सीबीआयनं लंडनला पाठवला आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओ

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात लंडनच्या न्यायालयानं सीबीआयला आर्थर रोड कारागृहाचा एक व्हिडिओ पाठवण्यास सांगितलं होतं. त्यानुसार सीबीआयनं आर्थर रोड कारागृहाचा एक व्हिडिओ लंडनच्या न्यायालयाला पाठवला आहे.

मल्ल्याचा आरोप

भारतातील बँकांना ९ हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्यानं मुंबईतील आर्थर रोड कारागृह कैद्यांसाठी योग्य नसल्याचा आरोप केला होता. लंडनच्या न्यायालयात मल्ल्यानं हा आरोप केला होता. त्यानुसार लंडन न्यायालयाने ही सूचना केली होती.

प्रत्यार्पणाची विनंती

भारत सरकारने इंग्लंडला विजय मल्ल्याचं प्रत्यार्पण करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी सीबीआयनं इंग्लंडच्या न्यायालयात मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातील १० मिनिटांचा व्हिडिओ सादर केला. या व्हिडीओमध्ये मल्ल्याला ठेवण्यात येणाऱ्या बराक नंबर १२ चं चित्रीकरण दाखवण्यात आलं.

काय सुविधा?

ऑर्थर रोड तुरूंगातील बराक नंबर १२ मध्ये मल्ल्यासाठी टीव्ही, वैयक्तिक स्वच्छतागृह, फिरण्यासाठी मोकळी जागा, अंथरूण, बराकीची स्वच्छता ठेवण्यात येईल तसंच सर्व प्रकारची औषधे पुरविण्यात येतील असं नमूद करण्यात आलं आहे.


हेही वाचा-

मल्ल्यासारखं बँकेला फसवायला गेला, पण पोलिसांच्या तावडीत सापडला

नीरवची आणखी २६ कोटींची मालमत्ता जप्त


पुढील बातमी
इतर बातम्या