नीरवची आणखी २६ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने केलेल्या तपासणीत अधिकाऱ्यांनी १५ कोटी रुपयांची अँटीक ज्वेलरी ताब्यात घेतली यांत १० कोटी रुपयांच्या एका अंगठीचा समावेश आहे. सोबत १.४० कोटी रुपयांची महागडी घड्याळं आणि १० कोटी रुपयांची पेंटीग्ज जप्त केली आहेत. पेटींग्जमध्ये प्रामुख्याने नामवंत चित्रकार एम. एफ. हुसेन, अमृता शेरगील आणि के. के. हिब्बर यांच्या पेंटींग्जचा समावेश आहे.

नीरवची आणखी २६ कोटींची मालमत्ता जप्त
SHARES

पंजाब नॅशनल बँकेचा तब्बल १३, ५४० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या वरळीतील घरी छापा मारून अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयने २६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेत प्रामुख्याने डायमंड ज्वेलरी, पेंटींग्ज, महागड्या घडाळ्यांचा समावेश आहे.


३ दिवस सुरू होती कारवाई

नीवर मोदीच्या वरळीमधील समुद्र महल इमारतीतील फ्लॅटचा ताबा सध्या ईडी आणि सीबीआयकडे आहे. या दोन्ही तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे गुरूवारपासून फ्लॅटमधील झाडाझडतीला सुरूवात केली. शनिवारी सकाळपर्यंत ही झाडाझडती सुरूच होती.


तपासणीत काय हाती आलं?

या तपासणीत अधिकाऱ्यांनी १५ कोटी रुपयांची अँटीक ज्वेलरी ताब्यात घेतली यांत १० कोटी रुपयांच्या एका अंगठीचा समावेश आहे. सोबत १.४० कोटी रुपयांची महागडी घड्याळं आणि १० कोटी रुपयांची पेंटीग्ज जप्त केली आहेत. पेटींग्जमध्ये प्रामुख्याने नामवंत चित्रकार एम. एफ. हुसेन, अमृता शेरगील आणि के. के. हिब्बर यांच्या पेंटींग्जचा समावेश आहे.


२५१ मालमत्तांवर छापा

तपास यंत्रणांनी आतापर्यंत नीरव मोदी याच्या देशभरातील २५१ मालमत्तांवर छापा टाकला असून त्यात हिरे, सोन्याचे दागिने, कार, घड्याळ, पेंटीग्ज, इत्यादी महागड्या वस्तूंचा समावेश आहे.


७६३८ कोटींची जागा जप्त

या सोबत तपास यंत्राणांनी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांची ७ हजार ६३८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ताही ताब्यात घेतली आहे. यामध्ये देशभरातील शोरूम, फ्लॅट, गोदाम, बंगले यांचा समावेश आहे.



हेही वाचा-

३० कोटी अन् महागडी घड्याळं, नीरव मोदीच्या संपत्तीवर धाडी सुरूच

'पीएनबी' घोटाळ्यानंतरही नीरव मोदीचे व्यापाऱ्यांशी व्यवहार सुरूच

नीरव, विजय मल्ल्यासह १८४ जणांनी बँकांना लुटलं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा