नीरव, विजय मल्ल्यासह १८४ जणांनी बँकांना लुटलं


नीरव, विजय मल्ल्यासह १८४ जणांनी बँकांना लुटलं
SHARES

भारतीय बँकांना फसवून परदेशात पळालेले विजय मल्ल्या आणि नीरव मोदी हे आरोपी मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. पण, हे दोघं अपवाद नाहीत, तर आणखी १८४ जणांनी भारताला लुटून परदेशात पळ काढल्याचं माहिती अधिकारात पुढं आलं आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये सर्वाधिक ९ हजार ८३५ कोटी रुपयांचे फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पीएनबी घोटाळ्यानंतर आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मुंबई पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली. या माहितीत नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचे स्वरुप नमूद करण्यात आले होते.


किती रुपयांची फसवणूक?

त्यावेळी उत्तरात घाडगे यांना २०१५ मध्ये ५५६० कोटी रुपये, २०१६ मध्ये ४२७३ आणि २०१७ मध्ये ९८३५ कोटी रुपये फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. विशेष म्हणजे पोलिसांनी ७४ गुन्ह्यांमध्ये फक्त दीड कोटी रुपये आतापर्यंत हस्तगत केले आहेत.


किती जणांना शिक्षा?

आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार २०१५ पासून ते २०१७ पर्यंत अंदाजे वर्षाला सरासरीनुसार ११० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यापैकी २० गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. तर ६० गुन्ह्यात आरोपींना दोषमुक्त केलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेत पोलिसांचं अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता. गुन्हे नोंदणीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गुन्हे उकलीचं प्रमाण कमी असल्याचं दिसून येतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा