३० कोटी अन् महागडी घड्याळं, नीरव मोदीच्या संपत्तीवर धाडी सुरूच


३० कोटी अन् महागडी घड्याळं, नीरव मोदीच्या संपत्तीवर धाडी सुरूच
SHARES

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याच्याभोवतीचा फास आवळण्याचं धोरण अंमलबजावणी संचालनालयाने कायम ठेवलं आहे. त्यानुसार 'ईडी'ने शुक्रवारी नीरव मोदी कंपनीचं ३० कोटी रुपये असलेलं खातं, १३.८६ कोटी रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. एवढंच नाही, तर कारवाई दरम्यान 'ईडी'ने १७६ स्टीलचे कपाट आणि ६० प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये लपवून ठेवलेली महागडी घड्याळं, परफ्यूम्स जप्त केली आहेत.


काय सापडलं?

शुक्रवारी 'ईडी'ने नीरवचे बँक खाते गोठवून त्यामधील ३० कोटी रुपये जप्त केले. त्याचबरोबर १७६ महागडी घड्याळे, १५८ बंद बाॅक्स, ६० प्लास्टिक कंटेनरही हस्तगत केले आहेत.



'पुन्हा चौकशी करा'

अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातील ज्या बँकेतून संशयास्पद (पीएनबी एलओयूच्या आधारे) आर्थिक व्यवहार झाले. त्या हाँगकाँगमधील ४ बँकांना पत्र पाठवून अर्थ मंत्रालयाने या व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितलं आहे.


मोठं कर्ज घेणाऱ्यांवर नजर

सोबतच सर्व बँकांना 'एलओयू'च्या आधारे झालेल्या संशयास्पद व्यवहारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. याशिवाय २५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचं कर्ज घेणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष प्रतिनिधी किंवा एजन्सीची नियुक्ती करण्यासही सांगितलं आहे.


कारही हस्तगत

'पीएनबी'त ११ हजार ४०० रुपयांचा घोटाळा करणारा फरार मुख्य आरोपी नीरव मोदीच्या वरळी आणि अलिबाग येथील फार्महाऊसवर छापे टाकत 'ईडी'ने मंगळवार आणि बुधवारी ८६ कोटी रुपयांच्या 9 कारसह मौल्यवान दागिने हस्तगत केले आहेत. मात्र हे दागिने कमी कॅरेटचे असल्याचं तपासात पुढे आल्याने त्यांची मूळ किंमत तपासून घेण्याचं काम सुरू आहे.



हेही वाचा-

'या' आलिशान कार्समध्ये फिरायचा नीरव, 'ईडी'ने केल्या जप्त

पीएनबी घोटाळ्यात आणखी 5 जणांना अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा